खेड : ज्ञानदीप विद्यामंदिरच्या भूमी भिंगारेला डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कांस्य पदक

खेड : मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात येणार्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव येथे इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भूमी भिंगारे हिला डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कांस्य पदक प्राप्त झाले आहे. भूमीने ‘शाश्वत लॅन्डस्केपिंग’ या विषयांतर्गत ‘टाकाऊतून टिकाऊ कुंडयांचा वापर, शाश्वत लॅन्डस्केपिंगच्या सौंदर्यात भर!’ या शीर्षकाचा सर्वेक्षणात्मक प्रकल्प सादर केला होता.

ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व प्रकल्प निर्मिती अशा तीन टप्प्यांमध्ये होते. या तिन्ही टप्प्यांमध्ये यश मिळवून भूमीने कांस्य पदक प्राप्त केले आहे व तिची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. भूमीला विज्ञान शिक्षक रागिणी जामकर व विनोद टेंबे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्पकार्यात प्रभाकर कांबळे, रामभाऊ गिरी, प्रवीण छपरे, भूमीत पटेल, भरत पटेल, रामचंद्र मेटकर, रसिक पाटणे, अजित दांडेकर, सिद्धेश शिगवण तसेच पालक यांचेही भूमीच्या यशात सहकार्य लाभले आहे.

भूमीच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 18/Apr/2025