मंडणगड : वेसवी येथे सुरू असलेल्या अनधिकृत शाळेच्या विरोधात पंचायत समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेले उपोषण चर्चेतील कार्यवाही आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
मुनीरखान साखरकर, आनंद भाटे, इस्माईल उंडरे, सलीम हमदुले, अब्दुलसत्तार हजवाने, मकबुलअहमद नाडकर, लियाकत हजवाने, शेखमोहम्मद ठंडरे, प्रवीण दरीपकर, बदरुद्दीन उंडरे हे वेसवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ ७ ऑक्टोबरला पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसले होते. याबाबत कोकण एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी बाणकोट यांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. वेसवी ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत येणारी एक अनधिकृत नियमबाह्य शाळा सुरू आहे, याबाबत पत्रव्यवहार केला होता, या नियमबाह्य शाळेमुळे परिसरातील १५ ते १६ गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित शाळा व संस्थाचालकांवर कारवाई करून शाळा बंद करण्यात यावी, अशी मंडणगड पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसलेले वेसवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मागणी केली होती, मात्र गेल्या दीड महिन्यात गटविकास अधिकारी यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिदि यांनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. शिक्षणाधिकारी यांख्या आदेशनानुसार, शिक्षण विभागाने नमूद शाळेबाबत कार्यवाही केलेली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन भूतकाळातील घडामोडींचा विस्तृत चौकशी अहवाल प्रामस्थांचे म्हणणे नमूद करून तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचबरोबर रितसर भागनि योग्य ती सर्व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी उपोषण स्थगित करावे, असे आवाहन केले. त्यानंतर प्रामस्थ, गटशिक्षणाधिकारी नंदलाल रिदि, गटविकास अधिकारी विशाल जाधव यांच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांचे दालनात चर्चा झाली. एक महिन्यात उचित कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 09-10-2024