रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलं एकत्र येऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकासाठी, आणि सुट्टी मध्ये होणारा मोबाईल आणि टीव्ही चा अतिवापर टाळून, त्यांना खेळ, आणि विविध उपक्रम यांची गोडी लावण्यासाठी यंदा ही “युवाब्रह्म” तर्फे 5 ते 8 वयोगटातील मुलांसाठी दि. 30 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत “छंद वर्ग” या उन्हाळी शिबिराचे आयोजन गोखले भवन, नाचणे – साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी योगा, श्लोक, चित्रकला, गाणी, गोष्टी, खेळ, याच बरोबर जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी तसेच सर्प मित्र आणि इतर तज्ञ् मंडळी ही मुलांना भेटून त्यांचे विशेष मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.
या छंदवर्ग उन्हाळी शिबिरात नाव नोंदणी करण्यासाठी हर्षदा – 8605167535 ओमप्रकाश- 9960375796 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 18-04-2025














