चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात आज डॉ. भारत वाटवानी यांची मुलाखत

चिपळूण : मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सजग स्वास्थ्य क्लिनिकतर्फे कुमारवयीन मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने डॉ. बाबा आमटे यांचे मानसपुत्र व मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. भारत वाटवानी यांचे ९ ऑक्टोबर रोजी चिपळुणात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

भटक्या मनोरुग्णांच्या पुनर्वसन संदर्भात त्यांच्या संस्थेचे मोठे काम आहे. शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी १२ वा. हे व्याख्यान होईल. यावेळी डॉ. वाटवानी यांची ‘ध्यास आणि प्रवास’ या विषयावर ऋतुजा खरे या मुलाखत घेतील. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रुतिका कोतकुंडे, प्रा. मुग्धा पाध्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 09-10-2024