रत्नागिरी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघटनेचे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन

रत्नागिरी : सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू झाली पाहिजे, अर्जीत रजेचा फरक मिळालाच पाहिजे तसेच सेवानिवृत्त बांधवांच्या मूळ वेतनात वाढ झालीच पाहिजे, अशा घोषणा देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी संघटनेने आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठीचे साखळी उपोषण सुरू केले होते. मंगळवारी उपोषणाचा सातवा दिवस असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहील, अशी माहिती प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या वेळी साळवी स्टॉप येथील कार्यालयासमोर सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश सोहनी, कार्याध्यक्ष कमलाकर गावखडकर, उपाध्यक्ष अशोक बंडवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सेवा निवृत्त मुख्य अभियंता व संघटनेचे पदाधिकारी देवेंद्र लांडगे, सुधीर काळे, रवींद्र कांबळे, प्रशांत सुर्वे उपस्थित होते.

जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासूनच्या आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 09/Oct/2024