कोकणातील धरणांमध्ये ४१.७२ टक्के पाणी साठा

ठाणे : उन्हाचा पारा चढला असताना मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिलच्या १७ तारखेला या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या १७३ मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये १ हजार ८१८ दशलक्ष घनमीटर अर्थात ४१.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भाग वगळता शहरी भागात अद्याप तरी पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आलेली नाही.

कोकणातील १७३ धरणांमध्ये ३७०४. ९७दश. घ. मी. उपयुक्त पाणी साठा असून त्यापैकी १८१८. द. श. घ. मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी ४८. ३४ टक्के पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठा अधिक असला तरी शहरी भागातील अनेक भागात पाणीसाठी नागरिकांना रात्र रात्र जागरण करावे लागत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात १४५.७४ दश घमी पाणी साठा आहे. धरणात उपयुक्त पाण्याचा साठा ४३.०१ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३७ टक्के पाणी अधिकचा आहे. शहापूर तालुक्यातील भातसा धरणात ४३३.४३ दश घ मीटर पाणी साठा शिल्लक आहे. धरणामध्ये ४६.०१ टक्के पाणी साठा शिल्लक असून गतवर्षी हाच साठा ४०.६५ टक्के आहे. तानसा धरणात ३५.८० टक्के तर मोडकसागर ४३.०२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 18-04-2025