रत्नागिरी : मंगळवारच्या बाजारातून दुचाकीची चोरी

रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर येथील मंगळवार बाजारात भाजी खरेदीसाठी लावलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी महादेव बाप काळे (वय ३७, व्यवसाय नोकरी, रा. नगरपरिषद कॉलनी, चर्मालय मजगांव रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी महादेव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ते मंगळवार बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची १५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस (क्रमांक एम.एच.०८.वाय.३७४९) सार्वजनिक शौचालयासमोर रस्त्यावर पार्क केली होती. काही वेळानंतर ते परत आले असता, त्यांची दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने त्यांची काळ्या रंगाची, त्यावर निळ्या पट्टे असलेली दुचाकी चोरून नेली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 19-04-2025