Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा भडका! IMDने दिला इशारा..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मार्च महिन्याच्या मध्यापासून अनेक बदल होत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी अवकाळीचे ढग तर कधी उष्णतेत वाढ अशी परिस्थिती दिसत आहे. परंतु आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.(Heat alert)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अकोल्यामध्येही सूर्याचा पारा चढताना दिसत आहे. अकोल्यात ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून विदर्भात पारा चढताना दिसत आहे.(Heat alert)

तर परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अमरावती, वाशिम याठिकाणीही ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात आज उन्हाचे चटके अधिक जाणवतील असेही हवामान विभागाने कळविले आहे.(Heat alert)

राज्यात मागील काही दिवसांपासून अचानक अवकाळीचं संकट आलं आणि जवळपास सर्वच भागांमध्ये अवकाळीने हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपिट देखील मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

चंद्रपूर, जळगाव, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, वाशिम याठिकाणी जोरदार पाऊस झाला. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता मात्र सर्वत्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे.(Heat alert)

चक्राकर वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मार्च आणि एप्रिलमध्येही थोडासा थंडावा जाणवला.

आता मात्र, अवकाळीचे ढग दूर गेले आहेत. त्यामुळे राज्यात परत एकदा उष्णता वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून उष्णतेत वाढ होताना दिसत आहे.(Heat alert)

IMDने काय दिला इशारा

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

राज्यात उष्णता वाढत असल्याने नागरिकांनी यादरम्यान काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णता अधिक वाढण्याचे देखील संकेत देण्यात आले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांमध्ये ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याचेही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाचा वेग पाहता, पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 19-04-2025