लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गोदामातून २ लाख ७२ हजारांची चोरी

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या गोडावूनमधील २ लाख ७२ हजार ६४६ रुपये ऐवजाची चोरी झाली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. तर दोघे पसार आहेत. ही चोरी १४ ते १५ एप्रिल या कालावधीत झाली आहे. कृष्णा अशोक गांगुर्डे (वय ४२) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी अमित तुळशीराम गायकवाड (३२, सध्या रा. नवी मुंबई, ऐरोली), दत्तात्रय शिवाजी गोडसे (२४) व मारुती विलास गवळी (२०, दोन्ही रा. नरळेवस्ती, खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी संशयित अमित गायकवाड याला १५ एप्रिलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 19/Apr/2025