संगमेश्वर : करजुवे गावामधील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. या गावात दोन वाड्यांतील लोकांचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता. प्रशांत यादव यांनी तत्काळ आश्वासन देऊन प्रश्न सोडवला. यावेळी त्यांनी माखजन येथील ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. धामापूरमधील वाघजाईमातेचे दर्शन घेतले. यावेळी योगेश रेडीज, माजी सभापती सुभाष नलावडे, संतोष डावल, प्रशांत विचारे, श्यामसुंदर माने, आनंद गुरव, कीर्ती सागवेकर, आशिष चोचे, संजय भायजे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 09/Oct/2024














