राजापूर : शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे भविष्यात शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा होऊन पाणीटंचाईचे संकट कायमचे दूर होणार आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
या योजनेसाठी कौन्सिल सभा दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी ठराव मंजुरी व निविदा प्रक्रिया करणेसाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर स्थायी समिती सभा ठराव क्र. ७२ ला दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी मंजुरी प्राप्त झाली होती. त्यानंतर निसर्ग कन्सल्टन्सी नाशिक यांना दि. १२ जानेवारी २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला व कार्यारंभ आदेशानंतर निसर्ग कन्सल्टन्सी यांचे अधिकारी यांच्यासमवेत डीपीआरबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. फेब्रुवारी २०२३ रोजी तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे डीपीआर पाठविणेत आला.
दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी २९ कोटी ९६ लाख ७८ हजार ८४५ रुपये इतक्या रकमेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्याकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. ऑगस्टमध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर महाअभियान अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील सर्व लोकवस्तीला १३५ लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिन याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मंजूर झाली आहे, असे अॅड. जमीर खलिफे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 09/Oct/2024














