रत्नागिरी : ग्रामसंघांना अंमलबजावणी साहाय्य संस्थेचा दर्जा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर समुदायांना एकत्रित व सहभागी करून घेण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी गावातील इच्छुक च सक्षम ग्रामसंघांची अंमलबजावणी साहाय्य संस्था (आयएसआय) म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ११२४ गावांमध्ये या ग्रामसंघांची स्थापना होणार आहे.

केंद्र शासनामार्फत जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत असून, योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमानवी किमान ५५ लिटर याप्रमाणे पिण्यासाठी गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन उपक्रमामध्ये गावातील नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी नियोजन, आराखडा, अंमलबजावणी, व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्राम स्तरावर एकत्र करून त्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११२४ गावांमध्ये साहाव्य संस्था म्हणून सक्षम ग्रामसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करण्यात येणार आहे. या ग्रामसंघांना ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापना, पुनरुज्जीवन करणे, अपेक्षित लोकवर्गणी करणे, योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी व्यवस्था निर्माण करणे, समित्यांच्या बैठका आयोजन, ग्रामसभा आयोजन करणे, सांडपाणी व्यवस्थापन है. विषयांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस साहाय्य करणे, नळ जोडणी संबंधित कुटुंबांना प्रोत्साहित च प्रवृत्त करणे आदी कामे असणार आहेत. वासोचतच ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत व जिल्हा कार्यालय यांच्यामध्ये दुवा म्हणून काम पाहणे, समाज संघटन व माहिती व संवाद उपक्रम राबविणे, केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील विविध अभियानांमध्ये सक्रिय सहभागी होऊन अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे, पाण्यासंबंधी विविध बाबी जसे पाऊसपाणी संकलन, कृत्रिम पुनर्भरण, पाणी गुणवत्ता, पाण्याची हाताळणी, पाणीपुरवठा योजना इ. संबंधी जाणीव जागृतीपर उपक्रम राबविणे आदी त्यांचे कार्य असणार आहे.

बचतगटांना अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हयातील ११२४ गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनामध्ये महिला बचतगटांना रोजगाराची संधी मिळणार असून, जास्तीत जास्त महिला ग्रामसंघानी तालुका अभियान कक्ष, उमेद व ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय ठेऊन अर्ज करावा. प्रोत्साहन म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीनिहाय ग्रामसंघांना कामांच्या फळनिश्चितीपर आधारित रु. २ हजार रुपये मिळणार आहेत. बचतगटांनी यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 09/Oct/2024