राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर राजापूर आगारासमोर नाकाबंदी दरम्यान एका मारुती सुझुकी गाडीतून वाहतूक करण्यात येणारे गोवा बनावटीचे मद्य राजापूर पोलिसानी कारवाई करीत जप्त केले आहे. राजापूर पोलिस ठाणेचे पोलिस कॉन्स्टेबल दीपक काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
एका मारुती सुझुकी गाडीमध्ये २१,६०० रुपये किमतीचे एकूण १५ खाकी बॉक्स आढळून आले असून त्या प्रत्येक बॉक्स मध्ये प्लास्टिकच्या बॉब्स लेमन व्होडका गोवा बनावटीच्या १८० मिली मापाच्या ७२० सिलबंद बाटल्या आढळून आल्या असल्याची माहिती राजापूर पोलिसानी दिली आहे.
या कारवाईत राजापूर पोलिसानी १,००,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी गाडी व २१ हजार ६०० रुपयाचे गोवा बनावटीचे मद्य असा १,२१,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसानी या कारवाइत हस्तगत केला आहे या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:37 AM 21/Apr/2025














