खेड : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खेड शाखेतर्फे कवी केशवसुत यांची जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कवी केशवसुत यांच्या प्रतिमेला खेड शाखेचे अध्यक्ष विवेक ऊर्फ राजन दांडेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रा. वसंत भुसारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले, यात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पेन व एक पुस्तक भेट देण्यात आले. शाखेचे अध्यक्ष विवेक दांडेकर यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष गोविंद राठोड यांनी कोकण रेल्वेने कवी केशवसुतांच्या तुतारी कवितेचा मान ठेवून एका रेल्वेगाडीला तुतारी एक्सप्रेस असे नामकरण केले असल्याचे सांगितले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शाखेच्या उपाध्यक्ष प्रा. संपदा काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रा. अनघा तोडकरी यांनी आई कवितेचे वाचन केले व आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 09/Oct/2024














