BCCI Central Contract 2025-2026: बीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी 2025-2026 या एक वर्षासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे.
तर श्रेयस अय्यरला बी प्लस श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. तसेच ईशान किशनचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयकडून केंद्रीय करार जाहीर, पाहा यादी
श्रेणी A+
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- जसप्रीत बुमराह
- रवींद्र जाडेजा
श्रेणी A
- मोहम्मद सिराज
- के. एल. राहुल
- शुभमन गिल
- हार्दिक पांड्या
- मोहम्मद शमी
- ऋषभ पंत
श्रेणी B
- सूर्यकुमार यादव
- कुलदीप यादव
- अक्षर पटेल
- यशस्वी जैस्वाल
- श्रेयस अय्यर
श्रेणी C
- रिंकू सिंग
- तिलक वर्मा
- ऋतुराज गायकवाड
- शिवम दुबे
- रवी बिश्नोई
- वॉशिंग्टन सुंदर
- मुकेश कुमार
- संजू सॅमसन
- अर्शदीप सिंग
- प्रसिद्ध कृष्णा
- रजत पाटीदार
- ध्रुव जुरेल
- सर्फराज खान
- नितीश कुमार रेड्डी
- ईशान किशन
- अभिषेक शर्मा
- आकाश दीप
- वरुण चक्रवर्ती
- हर्षित राणा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 21-04-2025














