मासेमारीचा खर्च लाखात, उत्पन्न हजारात; मच्छीमार हवालदिल

दापोली : समुद्रात मासेमारीला जाण्यासाठीचा डिझेलसह खर्च १ लाख १० हजार रुपये होतो, पण प्रत्यक्षात ७५ हजार रुपयांचीच मासळी जाळ्यात सापडते. तेही प्रत्येकवेळी तेवढीच मिळेल असे नाही. कधी-कधी ती कमीही मिळते. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी स्थिती मच्छीमारांची झाली आहे. सध्या आवकच घटल्यामुळे हर्णै बंदरातील मच्छीमार हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छी दुष्काळ जाहीर करून मदतीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच मच्छीमार नुकसानीत आहे. फास्टर, एलईडी आणि पर्ससीन नेट नौकांची घुसखोरीने पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे. त्यात हवामानातील बदलांमुळे मत्सोत्पादनावरही परिमाण झाला आहे.

बांगडा, पापलेट, कोळंबीचे दर वधारले आहेत, मागील आठवडयात सायंकाळी वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्राल जाणे टाळले. त्यामुळे बंदरात माशांची रेलवेल कमी होती. सध्या फक्त ३० टक्केच नौका मासेमारीकरिता जात आहेत, तर ७० टक्के नौका आंजलें खाडीत नांगर टाकून आहेत. हर्णे बंदरात लिलावावेळी २ ते ३ नौकांवरील माल बंदरात येत आहे. एप्रिलमध्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते, असा मच्छीमारांचा अनेक वर्षांचा अनुभव यंदा मात्र तो फोल ठरला आहे. त्यामुळे कटकरा मच्छीमार हतबल झाला दिवसभर मेहनत करून आणि आठ दिवसांकरिता फक्त डिझेलसाठी ९० हजार रुपये खर्च करून मिळालेल्या मासळीची किंमत ७५ हजार झाली. त्यामुळे झालेला खर्च कसा भागवायचा असा प्रश्न मच्छीमारांपुढे आहे.

परप्रांतीय नौकांची होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये हवामानातील बदलामुळे झालेले माशांचे स्थलांतर याचा परिणाम यंदाच्या मत्सोत्पादनावर झाला आहे. मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेकांनी नौकांवरील खलाशांना माघारी पाठविण्यास सुरवात केली आहे. अपेक्षित मासळी मिर नसल्याने माशांचे दरही वधारले आहेत.

मच्छीमारांसाठी हंगाम सर्वात वाईट यंदाचा गेला आहे. आवक कमी आणि खर्च जास्त अशी सध्याची स्थिती आहे खलाशांचा पगार, बर्फ, भत्ता हे सर्व नौकामालकलाच सोसाव लागते. सकाळी ८ वाजता बंदरात लिलाव सुरू होतो. तो अर्धा तासात आटपतो. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे शासन दुष्काळात अनुदान देते, त्याप्रमाणे मच्छीमारांनाही मदत द्यावी तरच मच्छीमार उभा राहील. सध्या तरी शासनाकडून मच्छीमारांन दिलासा मिळणे आवश्यक आहे – महेंद्र चोगले, मच्छीमार, हर्णे बंद

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 21/Apr/2025