गुहागर : चुलीवर जेवण बनवत असताना साडीने पेट घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या गुहागरातील महिलेचा मुंबई येथे उपचारादरम्यान २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.
मृत्यू झालेली महिला घरात चुलीवर जेवण बनवत असताना साडीच्या पदराने अचानक पेट घेतला. यामध्ये तिच्या पायाला, हाताला व कमरेला भाजल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात शनिवारी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 21/Apr/2025














