संगमेश्वर : देवरूखकर विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

कडवई : मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध वयोगटांत संगमेश्वर तालुक्यातील तुरळ शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित कै. अनंत बन्याबा देवरूखकर विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

१४ वर्षांखालील मैदानी क्रीडा स्पर्धेत सोहम जवरत याने उंच उडीत संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातील उंच उडीत प्राची डिके हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

१९ वर्षे वयोगटात भालाफेक मुली सिद्धी डिके प्रथम, उंच उडी मुली संजना जाधव द्वितीय, थाळीफेक मुली मुक्ता भायजे-द्वितीय, गोळाफेक मुली मयुरी जाधव द्वितीय, सेजल देसाई तृतीय, लांब उडी मुली – पायल कदम तृतीय, १०० मीटर धावणे मुली पायल कदम तृतीय, १५०० मीटर धावणे मुली मुक्ता भायजे द्वितीय, ३ किलोमीटर चालणे मुली- सेजल देसाई तृतीय, रिले ४ वाय १०० मीटर मुली द्वितीय क्रमांक, १५०० मीटर धावणे मुले ज्ञानदीप सोलकर द्वितीय, उंच उडी मुले कुणाल पाचकलेने द्वितीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांना रवींद्र अवघडे, योगेश पाचकले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक दत्तात्रय वाडकर, दादासाहेब साबणे, संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 09/Oct/2024