देवरुखामध्ये वायुसेना दिनानिमित्त एरोमॉडेलिंग शोचे प्रात्यक्षिक

देवरुख : शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरच्यावतीने मंगळवारी वायुसेना दिनी (एअरफोर्स डे) हायस्कूलच्या भव्य मैदानावर सकाळी भव्य एरोमॉडेलिंग शोचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हा थरार पाहून उपस्थित भारावून गेले.

सदानंद काळे आणि अथर्व काळे यांनी राफेल, सुखोई, तेजस, ग्लायडर, उडता मासा, गरुड अशा विमानांच्या मॉडेल्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविली. या कार्यक्रमाला परम विशिष्ठ सेवा मेडल प्राप्त निवृत्त एअर मार्शल मा. हेमंत भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

या एरोमॉडेलिंग शो हजारो विद्यार्थ्यांनी पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा विस्मय आणि आनंद दिसून आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण होईल, अशी आशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत यांनी व्यक्त केली.

देवरुखमधील प्राथमिक शाळांमधील शिक्षक पालक आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने हा शो पहायला आले होते. हेमंत तांबे यांनी ड्रोन कॅमेराद्वारे या कार्यक्रमाचे शूटिंग केले. देवरुख परिसरातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ आणि सृजन विज्ञान केंद्र कटिबद्ध राहणार असल्याचे भागवत यांनी स्पष्ट करुन यापुढे अशा कार्यक्रमांवर भर देणार, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 09/Oct/2024