रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नतीने बदली

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नोती झाली आहे. त्यामुळे त्यांची बदली झाली असून ते नेमके कोणत्या ठिकाणी रुजू होणार हे स्पष्ट झालेले नाही.

तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी तुषार बाबर यांनी सांभाळली. मुख्याधिकारी म्हणून काही काळ लांजा, राजापूर येथेही कामकाज पाहिले. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नगरपालिकेचा कारभार त्यांनी प्रभारी म्हणून चांगला सांभाळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 22-04-2025