राजापुरात उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

राजापूर : मागील अनेक दिवसांपासून पक्षप्रवेशांचा जोरदार धडाका लावलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) मंगळवारी तालुक्यातील उबाठा गटाला खिंडार पाडले. उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, जि. प.च्च्या माजी महिला बालकल्याण सभापती दूर्वा तावडे, जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिकांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समितीचे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 09/Oct/2024