संगमेश्वर : छत्रपती संभाजीनगर परिसरातील धोकादायक विजेचे खांब अखेर बदलले

संगमेश्वर : संगमेश्वर येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील धोकादायक आणि अपघाताला कारणीभूत ठरणारे विजेचे लोखंडी खांब बदलण्याची येथील स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत महावितरणकडून अवघ्या चार दिवसांत कार्यवाही सुरू केली. चार खांब बदलण्यात आले.

संगमेश्वर येथील छत्रपती संभाजीनगर येथील परिसरातील विजेचे लोखंडी खांब साठ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यातील काही लोखंडी खांब गंजलेले असून ते तत्काळ बदलण्याचीही गरज आहे. काही दिवसांपूर्वी येथील महावितरणच्या शाखा अभियंता म्हणून रुजू झालेल्या फारुक गवंडी यांची ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार आणि ग्रामस्थांनी कार्यालयात जाऊन भेट घेतली. परिसरातील जीर्ण खांब बदला, अशी विनंती केली. त्यांनी काही दिवसातच खांब बदलले जातील असे सांगितले. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 22/Apr/2025