रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित पितांबरी चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत अभिषेक चव्हाणने राहुल भस्मेवर मात करत विजेतेपद पटकावले.
देवरूख येथे झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्प्ते, दिलीप विंचू, पितांबरी प्रॉडक्ट्सचे विक्रेते वैभव साने, मोहन हजारे, पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी, खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अभिषेक चव्हाणने राहुल भस्मेचा (२०-१०, २५-१०) सलग सेटमध्ये पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत अभिषेक चव्हाणने अभिजित खेडेकरचा (२५-११, २५-००), तर राहुल भस्मेने योगेश कोंडविलकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. पुरुष दुहेरीमध्ये अभिषेक चव्हाण-दत्ताराम वासावे जोडीने सौरभ महाकाळ-दिनेश पारकर जोडीचा २५-००, ११-०८ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्यफेरीत अभिषेक चव्हाण-दत्ताराम वासावेने ओम पारकर नीलेश निवळकरच्चा तर सौरभ महाकाळ-दिनेश पारकरने राहुल कदम- राजेंद्र कदम यांचा ६-२, २१-०० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. कुमार गटाच्या अंतिम फेरीत ओम पारकरने द्रोण हजारेचा १४-००,८-१६, १०-४ पराभव केला. किशोरगटाच्या अंतिम फेरीत स्मित कदमने सर्वेश आमरेचा १५-४, ९-५ असा तर किशोरी गटात स्वरा कदमने स्वरा मोहिरचा १०-५, १००९ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 09/Oct/2024














