रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात भाजपने नमते घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. येत्या काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, दापोली, गुहागर, राजापूर हे मतदारसंघ शिंदे गट लढवणार असून चिपळूणात राष्ट्रवादी अजित पवार गट निवडणूक लढवेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर सिंधुदुर्ग मध्ये एक जागा भाजप आणि दोन जागा शिंदे गट लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वेचे कारण देत भाजपने शिंदे गटाला कमी जागा देत आपल्या स्वतःच्या पदरात जास्त जागा पाडून घेतल्या होत्या. मात्र निकालानंतर फार वेगळी वस्तुस्थिती समोर आली. महाराष्ट्रात २०२४ पूर्वी भाजपचे २३ खासदार होते. त्यांची संख्या घटून ९ झाली. हा मोठा बदल भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला असल्याने यावेळी भाजप कडून सर्वेचे कारण पुढे केले जात नसल्याचे दिसत आहे. मागील वेळी निवडून आलेल्या जागांनुसार त्या त्या पक्षाला जागा देण्याचे निश्चित होत असल्याचे दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 09-10-2024