रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या वर्ग ‘ड’च्या परिचरांना ‘क’ वर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी शिपाई पदावर काम करणारे शिपाई आता लिपिक बनले आहेत. जिल्हा परिषदेने ३१ कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती दिली.
आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. परिचरांना त्यांच्या सेवा कालावधीचा विचार करता कालबद्ध पदोन्नती देणे आवश्यक होते; परंतु अनेक वर्षांपासून हा विषय प्रशासकीय पातळीवरच प्रलंबित ठेवण्यात आला होता. मध्यंतरी प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेचा विचार करून वेतन श्रेणीचा लाभ दिल्यानंतर त्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला पदोन्नतीचा विषय हाती घेण्यात आला.
जिल्हा परिषदेने तब्बल ३१ परिचरांची ही पदोन्नती केली आहे. हे सर्व परिचर लिपिक बनले आहेत. सोमवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी ही प्रक्रिया बजावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 09/Oct/2024














