रत्नागिरी : मिरकरवाडा येथील दांडा फिशरीज जवळील फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी विभागाचे अधिकारी शरद भिडे यांनी फुटलेल्या जलवाहिनीची गळती काढून घेतली. नवीन नळपाणी योजनेंतर्गत टाकण्यात येणारी जलवाहिनी तातडीने अंथरावी, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांनी केली आहे.
मिरकरवाडा परिसराला पाणी पुरवठा करणारी जुनी जलवाहिनी दांडा फिशरीज ते स्मशानभूमीपर्यंतच्या अंतरात वारंवार फुटत असते. त्यामुळे मिरकरवाडा परिसराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. त्याचबरोबर पाणीसुद्धा वाया जाते. सोमवारी दांडा फिशरीज येथे फुटलेली जलवाहिनी मंगळवारी तातडीने दुरुस्त करून घेण्यात आली.
जुनी जलवाहिनी असल्याने ती वरचेवर फुटत असते. त्यामुळे नवीन नळपाणी योजनेंतर्गत प्रलंबित असलेली नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक साखरकर यांनी केली. आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 23/Apr/2025














