दापोली : सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांच्याकडील अधिसूचनेनुसार २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या दापोलीतील १०६ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण नुकतेच प्रशासनाकडून तहसीलदार अर्चना बोंवे, आणि नायब तहसीलदार शरद आडमुठे यांच्या उपस्थितीत मुलाच्या हस्ते चिड्डी काढून जाहीर करण्यात आले.
दापोली शहरातील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात काढण्यात आरक्षणामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात ६ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये मुगीज, वणौशी तर्फे नातू, पिसई या ग्रा. पं. साठी महिला राखीव तर आवाशी, माटवण, वांझळोली साठी सर्वसाधारण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी या प्रवर्गात ३ ग्रामपंचायती असून यात विसापूर, शिर्दे महिला राखीव तर नानटे सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये २९ ग्रा. पं. असून यात इनामपांगारी, करजगाव, कवडोली, टांगर, नवशी, भोमडी, शिरसाडी, साखळोली, पोफळवणे, गव्हे, आंबवली ब्रु. उंबर्ले, सडवे, कुडावळे या ग्रामपंचायतींसाठी महिला राखीव तर आपटी, कादिवली, खेडा, पन्हाळेकाजी, पाजपंढरी, शिवाजीनगर दा., भोपण, फणसू, हातिप, हर्णे, देगाव, मुरूड, कोंढे, भडवळे, चंद्रनगर या ग्रा. पं. साठी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.
सर्वसाधारण प्रवर्गात ६८ ग्रामपंचायती असून यात अडखळ, आगरवायंगणी, आसूद, ओणनवसे, करंजाणी, कर्दे, कांगवई, कात्रण, कुंभवे, कोळथरे, गावतळे, चिखलगाव, जामगे, जालगाव, टेटवली, डौली, ताडील, नवसे, पां. त. हवेली, पाडले, बोंडवली, रूखी, वडवली, वेळवी, शिरखल, शिरवणे, सा. त. नातू, सुकोंडी, सोवेली, आडे, कालेबंद्रे, पालगड, वाकवली दमामे या ग्रामपंचायतसाठी महिला राखीव तर असोंड, आंजर्ले, इळणे, उसगाव, उन्हवरे, उंबरशेत, करंजाळी, कळंबट, केळशी, कोंगळे, गिम्हवणे, गुडघे, तेरेवायंगणी, दाभोळ, दाभिळ, देहेण, नवानगर, टाळसुरे, पाचवली, पंचनदी, बांधतिवरे, बुरोंडी, महाळुंगे, मांदिवली, मुर्डी, मौजेदापोली, लाडघर, व. त. पंचनदी, विरसई, शिरसोली, शिवाजीनगर सा., साकुर्डे, सारंग, सोंडेवर या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 23/Apr/2025














