राजापूर : रानडुक्कराकडून भातशेतीचे मोठे नुकसान

राजापूर : सध्या भात पिके कापणीयोग्य झालेली आहेत; मात्र एकीकडे पाऊस कापणी करू देत नाही, तर दुसरीकडे तालुक्यातील हर्डी परिसरात डुक्करानी हैदोस घातला आहे. त्यामुळे या परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे. भातशेती तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. ही कापणी यापूर्वीच करण्याची आवश्यकता होती; मात्र सततच्या पावसामुळे कापणी पुढे ढकलण्यात येत होती. आता कुठे पाऊस थांबला, तर डुकरांनी शेतीचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे; यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 09/Oct/2024