गुहागर : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर नाका ते शासकीय विश्रामगृह या रहदारीच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे आणि रखडलेल्या कामाबाबत येथील संतप्त ग्रामस्थांनी गुहागरच्या लोकशाही दिनात विचारणा केली.
पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकारी यांच्याशी बोलणे करून येत्या दोन दिवसांत त्यांना जनतेसमोर बोलावण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार मेहता यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
विकास जाधव, अमित जोशी, अरूण भुवड, सखाराम अवेरे आदींनी येत्या ३० एप्रिलच्या आत या मार्गावर पडलेले खड्डे बुजवून चांगले कार्पेट मारून जनतेला रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
या रस्त्याबाबत गुहागर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी यांनी ऑगस्ट २०२४ ला राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आठवण म्हणून पुन्हा पत्रदेखील देण्यात आल्याचे सांगितले. हा रस्ता सध्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. दुरवस्था झालेल्या मार्गाची त्वरित दुरूस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 23/Apr/2025














