Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.
पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

अमित शाहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली.
पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह माहिती घेणार आहेत.

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी अमित शाहांसोबत उपस्थित आहे.
अमित शाह यांनी घटनास्थळी पोहचण्याआधी जम्मू काश्मिर पोलीस कंट्रोल रूममधे मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतलं.
अमित शाह यांनी यावेळी मृतांच्या परिवाराचं सांत्वन केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 23-04-2025














