रत्नागिरी : खो-खो खेळावरील निस्सीम प्रेमामुळे मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील ऐश्वर्या सावंत या खो-खोपटूने राज्य, राष्ट्रीयच नव्हे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च कामगिरी केली. तिचा राज्य शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. खेळातील याच कामगिरीच्या जोरावर तिची नुकतीच क्रीडाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत या नवदुर्गाने घेतलेली ही झेप निश्चितच सर्वांसाठीच आदर्शवत आहे.
शालेय जीवन ते महाविद्यालयीन स्तरावर खेळाची आवड जोपासताना त्यात नैपुण्य मिळवणे आणि पुढे त्याच क्षेत्रात करिअर करणे हा ‘दुग्धशर्करा’ योग आहे. लहान असतानाच ऐश्वर्याच्या आईचे निधन झाले. तिचे वडिलांनी बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करत ऐश्वर्या व तिच्या भावंडांचे संगोपन केले. ऐश्वर्या सातवीत असताना शिर्के प्रशालेचे क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांनी तिला खो-खो संघात सहभागी करून घेतले. तिथेच ऐश्वर्याला खो-खोचे बाळकडू मिळाले. तिने जिल्हा. विभाग, राज्यस्तरावर यश संपादन केले. नववीत असताना तिने राष्ट्रीय खेळात यश संपादन केले. त्यानंतर, तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
खो-खो खेळात चमकदार कामगिरी करत १८ राष्ट्रीय, तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत यश मिळवले. आतापर्यंत तिने १५ सुवर्णपदके व तीन रौप्यपदके मिळवली आहेत. २०१९ ता महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी निवड झाली. राष्ट्रीय स्तरावर यश मिळवताना ऐश्वयनि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप उमटवली.
राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्या तालमीत ऐश्वर्यान खो-खोचे धडे घेतले. तिला खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे यांचेही मार्गदर्शन मिळाले. पहाटे ६ वा. ऐश्वर्या सरावासाठी मैदानावर हजर असायची.
स्पर्धेपूर्वी व स्पर्धेनंतरही तिचा खेळाचा सराव सातत्याने सुरू होता, एअरपोर्ट ऑथोरिटीच्या संघातून खेळताना ऐश्वयनि राष्ट्रीय स्तरावर चांगला खेळ केला. सर्वोत्कृष्ट खेळामुळेच तिची क्रीडा विभागात क्रीडाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. लवकरच शासनाचे नियुक्तीपत्र आल्यानंतर कामाच्या ठिकाणी रूजू होणार आहे. आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ऐश्वर्याला खो-खो खेळामुळे उपलब्ध झाली आहे. तिच्या यशात तिचे पालक, कुटुंब, प्रशिक्षक, सहकारी खेळाडूंचे योगदान अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळावर लक्ष केंद्रीत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची पताका लावण्याचे काम ऐश्वर्याने केले आहे.
आताचे युग स्पर्धेचे युग आहे. मुली कोणत्याही ७७ क्षेत्रमध्ये मागे नाहीत. त्यामुळे मुलींनी क्रीडा क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, खेळले पाहिजे तरच आपण आल्या खेळाचे, देशाचे आणि आपले नाव मोठं करू शकतो. – ऐश्वर्या सावंत, खो-खो खेळाडू
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 09/Oct/2024














