चिपळूण : येथील मटण मच्छी मार्केट लिलाव प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विक्रेत्यांची नगर परिषदेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी लवकरच ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्यानंतर विक्रेत्यांच्या मागणीनुसार संबंधित इमारतीतील आवश्यक त्या सुविधा व दुरुस्ती केली जाणार आहेत. त्यानंतरच विक्रेत्यांकडून अनामत रक्कम व भाडे आकारले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
या बैठकीत नगर परिषद प्रशासनाने सांगितले की, बाजारमूल्य दर तक्ता २०२४-२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आला आहे. इमारतीत एकूण गाळे संख्या ४३ आहे. मात्र, त्यापैकी दर्शनी भागातील १ ते १५ दुकान गाळे व्यापारी संकुलासाठी आरक्षित आहेत. या गाळ्याचे अधिमूल्य (नापरतावा अनामत रक्कम) २,७१,८३८.५३ रुपये, तसेच प्रतिमहिना भाडे ३६५० रुपये इतके आहे.
व्यापारी संकुलच्या मागील बाजूला असलेले १ ते १० मच्छी व्यवसायासाठी आरक्षित आहेत. या गाळ्याचे अधिमूल्य (नापरतावा अनामत गतवर्षीच्या आहे. रुपये तसेच प्रतिमहिना भाडे २९०० रुपये आकारले जाणार आहे. याशिवाय मागील बाजूकडील १ ते १८ मटण व्यवसायाकरिता आरक्षित आहेत. या गाळ्याचे अधिमूल्य २,१७,५३५.९० रुपये व प्रतिमहिना भाडे २९०० रुपये आकारले जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 23/Apr/2025














