देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला : रॉबर्ड वाड्रा

Robert Vadra On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत.

अशातच आता या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वक्तव्याने वाद वाढू शकतो.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 28 लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. देशातील वातावरणामुळे हा हल्ला झाला आहे. मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जाणे किंवा मूर्ती शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करणे, यामुळे हा हल्ला झाला आहे.

तुम्ही बाबर किंवा औरंगजेबबद्दल बोललात, त्यामुळे अल्पसंख्याक दुखावले जातात. या मुद्द्यावर राजकारण होते आणि त्यांच्यावर निर्बंध लादले जातात. धर्म आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. जर हे थांबवले नाही, तर असे दहशतवादी हल्ले होतच राहील. पहलगाममध्ये नाव-धर्म पाहून गोळ्या झाडल्या. मुस्लिमांना दडपले जाण्याची भवना त्यांच्यात आहे, म्हणूनच त्यांनी हल्ला केला, अशी प्रतिक्रिया वाड्रा यांनी दिली.

वाड्रा पुढे म्हणतात, देशात सरकार हिंदुत्वाबद्दल बोलते, तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली आहे. यामुळे अशा संघटनांना वाटेल की, हिंदू सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहेत. धर्म पाहून गोळ्या झाडतात, हा पंतप्रधानांना संदेश आहे, असेही वाड्रा यावेळी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 23-04-2025