IPL 2025 Point Table : ‘मुंबई इंडियन्स’ची गुणतालिकेत मोठी झेप!, Points Table मध्ये उलटफेर..

हैदराबाद : मुंबई इंडियन्सनं सुरुवातीला ट्रेंट बोल्ट च्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादला हादरे दिले. यानंतर रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं हैदराबादला 7 विकेटनं पराभूत केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय ठरला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये 5 विजय मिळवले आहेत. या विजयाच्या जोरावर 10 गुणांसह नेट रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्सनं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

आयपीएल गुणतालिका (IPL Point Table)

अ.क्र.संघमॅचविजयटायपराभवगुणनेट रनरेट
1.गुजरात टायटन्स8602121.104
2.दिल्ली कॅपिटल्स8602120.657
3.मुंबई इंडियन्स9504100.673
4.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु8503100.472
5.पंजाब किंग्ज8503100.177
6.लखनौ सुपर जायंटस8503100.088
7.कोलकाता नाईट रायडर्स830560.212
8.राजस्थान रॉयल्स82064-0.633
9.सनरायजर्स हैदराबाद82064-1.361
10.चेन्नई सुपर किंग्ज82064-1.392

मुंबई इंडियन्सला विजयासाठी 144 धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सची सुरुवात चागंली झाली नाही. रियान रिकल्टन 11 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मानं विल जॅक्सनच्या साथीनं मुंबईची वाटचाल विजयाच्या दिशेनं कायम ठेवली. मुंबई इंडियन्सनं पॉवरप्लेमध्ये 56 धावा केल्या. रोहित शर्मानं 35 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्मानं 9 वर्षानंतर आयपीएलच्या हंगामात सलग दोन अर्धशतकं केली.

रोहित शर्मानं 46 बॉलमध्ये 70 धावा केल्या. रोहितनं 8 चौकार आणि 3 षटकार मारले. सूर्यकुमार यादवनं 19 बॉलमध्ये 40 धावा केल्या. सूर्यानं 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर, विल जॅक्सनं 19 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून संघाचं नेट रनरेट देखील सुधारलं आहे.

आयपीएलचा गतवर्षीचा हंगाम ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या जोडीनं गाजवला होता. या वर्षी सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीरांना तो सूर गवसलेला दिसत नाही. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा फेल ठरले. ट्रेविस हेड आज खातं देखील खोलू शकला नाही.तर, अभिषेक शर्मा 8 धावा करुन बाद झाला. इशान किशन 1 रन करुन बाद झाला. नितीश कुमार रेड्डी 2 धावा करुन बाद झाला.हेनरिक क्लासेन यानं 71 तर मनोहर यानं 43 धावा केल्या. अनिकेत वर्मानं 12 धावा केल्या. हैदराबादचे इतर खेळाडू दोन आकडी संख्या देखील पार करु शकले नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 24-04-2025