रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे शिल्लक राहिलेले सुमारे १२०० मीटरचे काम वेगाने सुरू झाले आहे. हा बंधारा स्थानिकांच्या सातबारा उताराऱ्यावर येत असल्यामुळे त्यावर तोडगा काढत येथील बंधारा ४० फूट समुद्रात बांधण्यात येणार आहे. त्यावरून रस्ताही बनवण्यात येणार आहे. त्यामुळे अलाव्यापासून ते अगदी पांढरा समुद्रपर्यंत स्थानिकांना समुद्राच्या उधाणापासून धोका कमी होणार आहे. यासाठी सुमारे १६० कोटीचे हे काम आहे; मात्र याच परिसरात किनाऱ्यावर बसरा स्टार जहाज अडकल्याने तेथील ३०० मीटरच्या बंधाऱ्याचे काम अद्यापही खोळंबलेच आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची चाळण होते. अकरुव लाटांमुळे समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागते. त्यावर पर्याय काढण्यात आला असून, सुमारे साडेतीन कि.मी.चा या भूपप्रतिबंधक बंधारा बांधला जात आहे. तीन वर्षांमध्ये ३ हजार १५० मीटर कामापैकी १ हजार १९१५० मीटर काम पूर्ण झाले आहे.
जयहिंद चौक ते पांढरा समुद्र असा १२०० मीटरचा टप्पा शिल्लक राहित्य होता. त्याचे कामही सुरू झालेले आहे. या परिसरात समुद्राचे अतिक्रमण झाल्याने लोकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेकांच्या नारळाच्या बागा, संरक्षक भिंती समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. तेथील जमीन स्थानिकांच्या सातबाऱ्यावर असल्यामुळे बंधाऱ्याचे काम थांबले होते. या परिसरातील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रातूनच व्हावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत त्यांनी आपली कैफियत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडली. त्यांनी यावर तोडगा काढला आहे. तेथे मरिन ड्राईव्हाप्रमाणे हा बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला आहे. या बंधा-यामुळे संपूर्ण मिऱ्यावासीयांचे संरक्षण होणार असून, पर्यटनवाढीलाही मदत होणार आहे. त्याअनुषंगाने त्यांनी बंधाऱ्याची रचना केली. बंधारा ४० फूट समुद्रातून बांधण्यात आला आहे. त्यावर चांगला रस्ता होणार असून, पर्यटनात्यही चालना मिळणार आहे. या पर्यायामुळे जयहिंद चौक ते पांढरा समुद्र, असे १२०० मीटरच्या बंधाऱ्याचे रखडलेले काम सुरू
किनारी पर्यटनाला चालना
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधला जात आहे तसेच मिऱ्या किनारी बसरा स्टार हे जहाज गेली चार वर्षे अडकून पडलेले आहे; मात्र आता हा पर्यटकांचा सेल्फी आणि रिल पॉईंट बनला आहे. त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येऊ लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 PM 24/Apr/2025









