रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुभाष थरवळ यांची फेरनिवड

रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सन २०२४-२०२७ च्या अध्यक्षपदी सुभाष थरवळ यांची फेरनिवड झाली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीची सभा होऊन संपूर्ण कार्यकारणीची निवडही बिनविरोध झाली. त्यामध्ये ही निवड झाली.

निवड झालेले इतर कार्यकारिणी सदस्य असे – डाॅ. विजयराव निंबाळकर कार्याध्यक्ष, श्रीमती पद्मजा बापट उपाध्यक्ष, दिलीप पवार कार्यवाह. कार्यवाहपदी श्रीमती आशा नागवेकर आणि कोषाध्यक्षपदी सुरेश पावसकर यांची निवड झाली. सर्वश्री श्रीहरी सरपोतदार, शरद रेडीज, भालचंद्र बापट, प्रकाश मांजरेकर आणि सुरेंद्र ठाकूर कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 09-10-2024