रत्नागिरी : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध उद्या 25 एप्रिल रोजी रत्नागिरीत करण्यात येणार असून यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीर पहलगाम येथे पाकिस्तान मधील इस्लामिक आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना त्यांचा धर्म विचारून आणि कलामा पडायला लावून मारले गेल्याचे बाब समोर आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून सकल हिन्दु समाज रत्नागिरी मार्फत हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा उद्या गुरूवार दि. 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता रत्नागिरी शहरातील गाडीतळ लक्ष्मी चौक येथून काढण्यात येणार आहे.
ज्या पद्धतीने हिंदू पर्यटकांना मारण्यात आले, त्याच निषेध करण्यासाठी आणि आपली एकजूट दाखवण्यासाठी या मोर्चात आपण आपले राष्ट्रीय व धर्म कर्तव्य समजून हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू संघटनांकडून रत्नागिरीकरांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 24/Apr/2025














