PM Modi on Pahalgam Attack: पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला..! पंतप्रधान मोदींची दहशतवाद्यांच्या काळजात धडकी भरवणारी भाषा

पंतप्रधान मोदी शुक्रवारी बिहारमधील एका सभेतील भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी भाष्य केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दु:खी आहे. पीडितांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे.

हल्ल्यातील जखमींवर उपचार सुरु असून त्यांना बरं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा, कोणी नवरा, तर कोणी भाऊ गमावलाय. या सगळ्यांच्या मृत्युमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपासून एकसारखी भावना आहे, असे मोदींनी म्हटले.

या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा, कोणी नवरा, तर कोणी भाऊ गमावलाय. या सगळ्यांच्या मृत्युमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपासून एकसारखी भावना आहे.

हा हल्ला निष्पाप पर्यटकांवर झालेला नाही. देशाच्या शत्रुंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केलाय त्यांना आणि यामागील सूत्रधारांना त्यांनी कधीही विचार केला नसेल त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल.

दहशतवाद्यांच्या उरली-सुरली जमीन नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे गर्भित इशारा देणारे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.

140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या आकाचे कंबरडे मोडून राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

भारत दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 24-04-2025