रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीसाची फसवणूक करणारा कॉन्स्टेबल निलंबीत

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून लग्नास नकार देत पुणे येथील महिला पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे येथील वाघेली पोलिस ठाण्यात या पोलीस कॉन्स्टेबलर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तो रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

अमोल मांजरे असे निलंबन करण्यात आलेल्या या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलिस भरतीसाठी तो ट्रेनिंग घेत असलेल्या एका अॅकॅडेमीत त्याची एका महिला स्पर्धकाशी ओळख झाली होती. त्यानंतर सन २०१८ मध्ये या दोघांचीही पोलिस भरतीत नियुक्ती झाली. अमोल रत्नागिरीत तर ती महिला पुणे येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्यात भेटी गाठी वाढू लागल्या.

त्यानंतर अमोलने त्या महिला पोलिस कर्मचारीला लग्नाचे आमिष दाखवले. तिने अमोलकडे लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी पाहिलेली असल्यामुळे मी तुझ्याशी लग्न करु शकणार नसल्याचे त्या महिला पोलिस कर्मचारीला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिला पोलीसांने याबाबत पूणे येथील वाघेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिस प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी पोलिस विभागाने अमोल मांजरेची प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबन केले आहे. त्याची प्राथमिक चौकशी रत्नागिरी पोलिसच करणार आहेत या गुन्ह्याचा तपास पुणे-वाघेली पोलिस ठाणे करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 25/Apr/2025