रत्नागिरी : साफसफाई केलेल्या ठिकाणी कचरा का टाकतेस असे विचारल्याच्या रागातून दांम्प्त्याला शिवीगाळ करत हातांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. क्रांतीनगर झोपडपट्टी येथे घडली. परसप्पा मुलीमनी, अळप्पा मुलीमनी, एक महिला आणि मरव्वा अळप्पा मुलीमनी (सर्व रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात परशुराम यल्लाप्पा मुलीमनी (४१, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी फिर्यादीची पत्नी नेहमीप्रमाणे त्यांच्या झोपडीच्या आजुबाजुच्या परिसरातील कचरा साफ करत होती. तेव्हा बाजुच्या झोपडीतील महिलेने साफसफाई केलेल्या ठिकाणी कचरा आणून टाकला. त्यावर फिर्यादीच्या पत्नीने तिला जाब विचारल्याच्या रागातून त्या महिलेने फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या आवाजाने फिर्यादी, त्यांची मुलगी आणि मेव्हणा बाहेर आले. त्यावेळी संशयितांनी संगनमताने या दाम्पत्याला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 25/Apr/2025














