लांजा : देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधील तहसील कार्यालय आवारात ७५ फुटी ध्वजस्तंभ उभारणार अशी संकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर चे आमदार किरण सामंत यांनी मांडली होती. आज पालकमंत्री यांचा संकल्प सत्यामध्ये उतरला आहे याचा आपणा सर्वाना अभिमान आहे. त्यामुळे लोकार्पण झालेल्या ७५ फुटी ध्वजस्तंभाचा मान राखणे हे आपणा सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी लांजा येथे केले.
लांजा तहसील कार्यालय आवारात दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या ७५ फुटी ध्वजस्तंभाचा लोकार्पण उदघाटन सोहळा गुरुवारी सकाळी तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह बोलत होते. ध्वजस्तंभाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लांजा-राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जैस्मिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, लांजा-राजापूर-साखरपा आमदार किरण सामंत, लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता मिलिंद कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान लांजा तहसील कार्यलयाच्या आवारामध्ये दोन वर्षापूर्वी ७५ फुटी ध्वजस्तंभ बांधण्यात आला. मात्र ध्वजस्तंभाच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर गुरुवारी मोठ्या उत्साहात ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 25/Apr/2025









