कोल्हापुरात रिमझिम पावसाच्या सरी

कोल्हापुर : आज पहाटेपासून कोल्हापुरात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.

पावसाच्या सरींनी कोल्हापूर शहरातील रस्ते ओलेचिंब झाले आहेत. जोरदार वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबर ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली.

कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

पावसाच्या सरींमुळे कोल्हापुरातील वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बऱ्यापैकी पाऊस झाल्याने कोल्हापूरमधील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर