दापोली : जालगाव समर्थनगर येथे नवरात्रोत्सवात दांडिया नृत्य लक्षवेधी

दापोली : लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी विविध खेळ खेळत हा नवरात्रोत्सव साजरा व्हावा या उद्देशाने तालुक्यातील जालगाव येथील समर्थ नगरमधील महिला, लहान मुले, पुरुष मंडळी दांडिया नृत्य, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, प्रश्नमंजुषा यांसारखे मनोरंजनाचे खेळ खेळत हा नवरात्रउत्सव साजरा करत आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणण्याचे कौशल्य या नगराचे अध्यक्ष सुदर्शन खानविलकर, महेश शिंदे, श्री. निखार्गे आदी ज्येष्ठ मंडळींनी साधला आहे.

या निमित्ताने आपल्यातील अंगभूत नृत्यकौशल्यलाही वाव देत लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम नऊ दिवस आयोजित केले जातात. यामध्ये ज्येष्ठांपासून पास लहानांपर्यंत सगळेच आनंदाने सहभागी होत आहेत. यानिमित्ताने समर्थनगर मधील या एकोप्याच दर्शन घडत आहे. प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची लहान मुलांसाठी विविध खेळ व यातून साधलेले सामाजिक ऐक्य समर्थ नगरातील विविध सदस्यांकडून दिली जाणारी बक्षीस हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 09/Oct/2024