खेडमध्ये ३८७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण

खेड : नगरप्रशासनाने भटक्या पकडून त्यांचे कुत्र्यांना निर्बिजीकरण करण्याची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या ३३ दिवसात ३८७ कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती नगरपरिषदेतील स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी दिली.

शहरात भटक्या कुत्र्यांच्या वावराने पादचाऱ्यांसह वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. यो भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषदेने निर्बिजीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भोस्ते, भरणे, रेल्वेस्थानक येथील परिसरातून भटकी कुत्री शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी वावरणाऱ्या कुत्र्यांनाही पकडून त्यांचेही निर्बिजीकरण करण्यात, येत आहे.

पकडण्याच्या भीतीमुळे अनेक कुत्र्यांनी परिसरातून पळ काढला असून ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 25/Apr/2025