खेड : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या कळंबणी गावडेवाडी फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या दत्ताराम कृष्णा देवघरकर (वय-८०, रा-कळंबणी सुतारवाडी, ता. खेड) या वृद्धाला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हि दुर्घटना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४:१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची खबर मयताचे नातू विकी एकनाथ देवघरकर (वय-२३) यांनी येथील पोलिस स्थानकात दिल्यानुसार पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 25/Apr/2025














