Gold Silver Price 25 April: लग्नसराईच्या हंगामादरम्यान आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ६१७ रुपये प्रति १० ग्रॅमनं स्वस्त झाला. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,६६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.
तर, चांदी १२१ रुपयांनी स्वस्त होऊन ९७,५१३ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९८,३३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो १००४३८ रुपयांनी वाढ झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ६१४ रुपयांनी घसरून ९५,२८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ५६५ रुपयांनी घसरून ८७,६३३ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६३ रुपयांनी कमी झाला असून तो ७१,७५२ रुपयांवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३६१ रुपयांनी कमी होऊन ५६,९६६ रुपये झालाय.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, चीननं अमेरिकेच्या काही वस्तूंवरील शुल्क उठविण्याचा विचार सुरू केल्यानं शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे सोन्याच्या ‘सेफ इन्व्हेस्टमेंट’च्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 25-04-2025














