मेष: आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण – घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल.
विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.
वृषभ: आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान – सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील.
मिथुन: आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान – सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल.
कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल.
सिंह: आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
कन्या: आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे – पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल.
तूळ: आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. कामात सफलता व यश प्राप्त होईल.
वृश्चिक: आज आपण वाद – विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा.
धनु: आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल.
मकर: आजचा दिवस मित्र – परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल.
कुंभ: आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात.
मीन: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 26-04-2025














