मॉस्को: रशियाच्या बालाशिखा शहरात शुक्रवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटात (Moscow Car Blast) रशियन जनरल यारोस्लाव मोस्कलिक यांचा मृत्यू झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.
त्याच दिवशी ही घटना घडलीय. लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिक ते रशियन सैन्याच्या जनरल स्टाफच्या मुख्य ऑपरेशन्स डायरेक्टरेटचे उपप्रमुख होते. स्फोटात वापरलेली कार फोक्सवॅगन गोल्फ (Volkswagen Gol) होती. रशियन तपास समितीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हटले आहे की हा स्फोट रिमोट बॉम्बने घडवला गेला. तो एका उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यात आला होता. हा स्फोट तीक्ष्ण धातूच्या तुकड्यांनी भरलेल्या आयईडीमुळे (IED) झालाय. असेही यावेळी सांगण्यात आलंय.
अतिशय कडक जनरल असल्याची मोस्कलिक यांची ओळख
रशियन लष्करी ब्लॉग रेबारने म्हटले आहे की, स्फोट झाला तेव्हा जनरल मोस्कल्याक कारमध्ये नव्हते परंतु जवळच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर कारजवळ उभे होते. मात्र या माहितीची अद्याप तरी पुष्टी होऊ शकली नाही. मोस्कलिकबद्दल, रायबर ब्लॉगमध्ये म्हटले आहे की ते एक ‘सक्षम आणि कडक अधिकारी’ होते आणि त्याच्या ज्युनियर्सवर ते खूप कडक शिस्तने वागवत होते, म्हणून ते फारसे कुणाला पसंत केले जात नव्हते.’
बॉम्ब हल्ल्यांची मालिका
राजधानीपासून अवघ्या 20 मैलांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या बालाशिखा येथे फोक्सवॅगन गोल्फच्या स्फोटात रशियन सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या मुख्य ऑपरेशन्स डायरेक्टरेटचे उपप्रमुख जनरल यारोस्लाव मोस्कालिक यांचा मृत्यू झाल्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच मॉस्कोमध्ये शुक्रवारी होणारी बहुप्रतिक्षित बैठक झाली. रशियाच्या तपास समितीने मोस्कालिकच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की हा स्फोट तीक्ष्ण आणि घातक धातुच्या तुकड्याने भरलेल्या एका स्फोटक उपकरणामुळे झालाय. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
मात्र हा हल्ला रशियन अधिकाऱ्यांच्या मागील हत्येसारखाच होता, ज्यामध्ये युक्रेनमधील युद्धभूमीवर रासायनिक शस्त्रांचा वापर घडवून आणल्याचा आरोप असलेल्या रशियन जनरल लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांचाही समावेश आहे. डिसेंबरमध्ये मॉस्कोमधील एका अपार्टमेंट इमारतीबाहेर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेल्या रिमोटली ऑपरेटेड बॉम्बच्या स्फोटात रशियाच्या रेडिओलॉजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल प्रोटेक्शन फोर्सेसचे प्रमुख असलेले किरिलोव्ह यांची हत्या झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 26-04-2025














