Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात खात्यात

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारनं दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. महायुती सरकारच्या विजयात या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्र सरकरानं जुलै महिन्यापासून मार्च पर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतियेच्या दरम्यान देण्यात येणार आहे. ( Ladki Bahin Yojana )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12000 रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून 500 रुपये दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या 7,74,148 इतकी आहे. ( Ladki Bahin Yojana )

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या. ( Ladki Bahin Yojana )

लाडक्या बहि‍णींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही सातत्यानं त्यावर काम करत आहोत. एका टीमकून बँकिंगशी संबंधित अडचणी, कागदपत्रं आणि आधार लिकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी काम करते. ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील, असं आदिती तटकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. ( Ladki Bahin Yojana )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 26/Apr/2025