वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

गुहागर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरासाठी अपंगत्व कार्यक्रम समन्वयक सुप्रिया शिवाजी कांबळे मॅडम व श्री कदम सर (सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी), त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील, उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे सुषमा गायकवाड व पदवीधर शिक्षिका अफसाना मुल्ला व विद्यार्थी उपस्थित होते.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना क्लबफूट या आजाराविषयी माहिती सांगितली. हा आजार जन्माला आल्यावर लगेच समजतो व त्यावर मोफत उपचारही सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे केले जातात. कांबळे मॅडम यांनी अशा प्रकारची मुले असतील तर सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या मार्फत राबवणाऱ्या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली.

फळे खाऊन ज्या बिया असतात त्या बियांचा संचय विद्यार्थ्यांना करण्यास सांगितले व त्या बिया सरकारी जागा मिळेल त्या ठिकाणी लावून गरजू लोकांना फळे मिळतील व सावलीही ही मिळेल. अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे असे सांगितले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील सर यांनी क्लबफूट आजाराशी संबंधित मुले जर आढळली तर त्याबद्दल माहिती सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारार्थ दाखल काढण्यात येतील व पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना बियांचा संचय करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 26/Apr/2025